18 प्रेषितसनी हात ठेवा म्हणजे पवित्र आत्मा भेटस हाई दखीन शिमोन त्यासनाकडे पैसा ली गया, 19 अनी बोलना, "ज्या कोणवर मी हात ठेवसु त्याले पवित्र आत्मा भेटी असा अधिकार माले बी द्या."
20 तवय पेत्र त्याले बोलना, "तुना पैसाना तुनासंगेच नाश व्हवो, कारण देवनं दान तु पैसासघाई मिळाडाना प्रयत्न करा. 21 या गोष्टीसमा तुले भाग अनं वाटा नही कारण तुनं मन देवना नजरमा नीट नही शे. 22 तु तुना या दुष्ट ईचारबद्दल पश्चाताप करीसन प्रभुकडे प्रार्थना कर म्हणजे तुना या मनमातील ईचारबद्दल तुले क्षमा व्हई. 23 कारण तु भलताच कडुपणमा अनी अधर्मना बंधनमा शे अस माले दखाई राहीनं."
24 तवय पेत्र अनी योहानले शिमोन बोलना, "तुम्हीन सांगेल गोष्टीपैकी काहीच मनावर येवाले नको म्हणीसन तुम्हीन मनाकरता प्रभुकडे प्रार्थना करा."