12 अनी आनंदमा परमपिताले धन्यवाद देवानं, ज्यानी तुमले प्रकाशमा राहनारा देवना लोकसना जे वतन शे, त्यामा वाटा भेटाकरता पात्र करेल शे. 13 देवनी आपलाले आंधरनी शक्तीपाईन सुटका करीसन अनी त्याना प्रिय पोऱ्याना राज्यमा सुरक्षित आणेल शे. 14 १:१४ इफिस १:७त्या पोऱ्याना ठायी आपलाले मुक्ती म्हणजे आपला पापनी क्षमा व्हयेल शे.
ख्रिस्तनं कामं
15 ख्रिस्त दृश्य रूपमा अदुश्य देवनी प्रतिमा शे; अनी निर्माण करेल सर्व गोष्टीसमा तो पहिला जन्मेल पोऱ्या शे. 16 कारण स्वर्गामा अनी पृथ्वीमा सर्वकाही त्याना सामर्थ्यमा निर्माण कराई गयं. जे काही दृश्य, अदुश्य शे, सिंहासन राहोत, किंवा सामर्थ्य राहो, सत्ताधीश राहोत किंवा अधिपती राहोत सर्वकाही त्यानामा अनं त्यानाकरता निर्माण कराई गयं. 17 ख्रिस्त सर्व गोष्टी निर्माण होवाना पहिलाना तो अस्तित्वमा व्हता अनं त्यानी एकतामा सर्व गोष्टी आपला जागी स्थिर शेतस.