4 कारण आम्हीन येशु ख्रिस्तवर तुमना ईश्वासबद्दल अनी देवना सर्व लोकसविषयी तुमले वाटस त्या प्रितीबद्दल ऐकेल शे. 5 हाई आशाबद्दल तुम्हीन सुवार्ताना सत्यवचनमा सुरवातले ऐकेल शे. म्हणीसन तुमना ईश्वास अनी प्रेम त्या गोष्टीसवर आधारीत शे, ज्याकरता तुमले आशा शे, ती आशा स्वर्गमा तुमनाकरता सुरक्षित ठेयेल शे.