18 नम्र म्हणीसन देवदूतसनी उपासना करनारा, अनं स्वतःला दखास त्या गोष्टीसवर भरवसा ठेवनारा अनं दैहिक बुध्दीतीन उगाच गर्वमा फुगनारा कोणी मनुष्य तुमले फसाडीसन तुमनं बक्षीससले गमाडु नका. 19 २:१९ इफिस ४:१६अस मनुष्य ख्रिस्त जो मस्तक शे त्याले धरीसन राहस नही; त्या ख्रिस्तपाईन सर्व शरिरले स्नायु अनं बंधन यासना एकमेकसना आधारवर पुरवठा व्हस अनं त्यानी देवले योग्य वाटस ईतलं वाढत जास.