दानीएलना शिक्षण अनं त्याना सोबती
1 यहूदाना राजा यहोयाकीम याना कारकीर्दीना तिसरा वरीसले बाबेलना राजा नबुखद्नेस्सर यानी यरुशेलमवर चढाई करीन त्याले वेढा दिधा.1:1 २ राजे 24:1-2; २ इतिहास 36:5 2 देवनी यहूदाना राजा यहोयाकीम याले त्याना हातमा दिधं; त्याप्रमाणंच देवना मंदिरमाधलं काही भांडीबी त्याना हातमा दिधं; त्यानी ती शिनार देशले आपला दैवतसना घर आणात अनी आपला दैवतसना भांडारसमा ठेवात. 3 राजानी आपला 1:3 षंडखोजासना नायक अश्पनज याले आज्ञा करी की इस्त्राएल राजकुळसपाईन अनं सरदार घराणापाईन. 4 अव्यंग, सुरुप, सर्वा व्यवहारमा दक्ष, ज्ञानसपन्न, विद्यापारंगत अनी राजवाडामा वागामा योग्य अश जवान माणसे लि येवानं अनी त्यासले खास्द्यासनी विद्या अनं भाषा शिकाडानी. 5 राजा खाये त्या मिष्टअन्नमाईन अनी पिये त्या द्राक्षरसमाईन त्यासनं नित्य खावानं पेवानं चालीन तीन वरीसपावत त्यासनं संगोपन व्हवाले पाहिजे; हाई मुदत संपावर त्यासनी राजाना हुजूरमा येवानं, अशी राजानी आज्ञा करी. 6 ह्या जवान मंडळीसमा यहूदा वंशमाधला दानीएल, हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या ह्या व्हतात.