17 या चारी जवानसले देवनी सर्व विद्या अनं ज्ञान यामा योग्य अनं चतुर करा; दानीएल हाऊ सर्वा दृष्टांत अनं स्वप्नं यासना उलगडा करामा ज्ञानी व्हयना. 18 नबुखद्नेस्सर राजानी त्यासले आपलासमोर हजर करानी मुदत ठरायेल व्हती ती संपावर खोजासना सरदारनी त्यानासमोर त्यासले हजर करं. 19 तवय राजानी त्यासनासंगे भाषण करा; त्या सर्वासमा दानीएल, हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या यासना तोडीना कोणी दुसरा दखावामा वना नही; म्हणीन त्या राजाना सेवामा रावाले लागनात.