5 दक्षिणना राजा बलवान व्हई अनी त्याना एक सरदार त्यानापेक्षाबी बलवान व्हईसन त्याले राज्य प्राप्त व्हई; त्यानं राज्य मोठं व्हई. 6 काही वरीसनी मुदत भरावर त्यासना आपसमा मिलाफ व्हई; दक्षिणना राजानी पोर उत्तरना राजाकडे करारमदार कराले जाई; तरीपण तिनं बाहूबल कायम ऱ्हावाव नही अनी तो अनं त्यानं बाहूबलबी टिकावू नही; तर त्या स्त्रीले ज्यासनी आणात, ज्यानी तिले जन्म दिधा अनं ज्याने त्या काळामा तिले बळ पुरावं त्यानासंगे ती नष्ट व्हई.