28 तवय नबुखदनेस्सर बोलना, शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासनी आपला देववर भाव ठेवा, राजानं शब्द मोडात, आपला देवाशिवाय अन्य देवनी सेवा अनं उपासना करानी नही म्हणीन त्यासनी आपलं देह अर्पण करा, त्यासले त्यासना देवनी आपला देवदूत धाडीसन सोडायेल शे; त्याना धन्यवाद असो. 29 यानाकरता मी फर्मावस की, सर्वा लोके, प्रत्येक राष्ट्रना अनं प्रत्येक भाषा बोलनारा लोके, यासनापाईन जे कोणी शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासना देवनाविरूध्दमा काही बोलतीन त्यासनं तुकडा तुकडा करामा येतीन; त्यासना घरना उकिरडा करामा येतीन; कारण अश प्रकारंमा सोडावाले समर्थ दुसरा कोणी देव नही.