1 तु आपला तरुनपणना दिनमांसुध्दा आपला निर्मानकरतानी आठवन कर, वाईट दिन येवाना आगोदर अनी सांगशी, माले हाई दिनमा काहीच सुख नही. 2 त्या दिनमा सुर्य, चंद्र अनी तारा यासना प्रकाशनी आगोदर आंधार वाढी अनी पाणी पडावर काया ढग परत येतीन. 3 त्या येळले महालना पहारेकरी थरथर कापतीन अनी ताकदवान मानसे वाकी जातीन, अनी दयनाऱ्या बाया थांबी जातीन कारण त्या कमी शेतस, अनी ज्या खिडक्यासमाईन दखनाऱ्या शेतस त्यासले चांगल दखता येवावू नही.
Publicidade