पौलनी प्रार्थना
15 म्हणीसन तुमनामाधला प्रभु येशुवरना ईश्वास अनी सर्व देवना लोकसकरता तुम्हीन व्यक्त करेल प्रिती यानाबद्दल मी ऐकीसन; 16 मी बी तुमनाकरता आभार मानामां खंड पडु देस नही; मी मना प्रार्थनामा तुमनी आठवण करीसन असं मांगस की, 17 आपला प्रभु येशु ख्रिस्त याना देव जो वैभवशाली पिता यानी तुमले आपला वळख व्हवाकरता ज्ञानना अनी प्रकटीकरणना आत्मा देवाले पाहिजे; 18 म्हणीसन त्यामुये तुमना अंतःकरण प्रकाशित व्हईसन त्याना पाचारणमुये निर्माण व्हनारी आशा कोणती, "पवित्र जणसमा" त्यानी देयल "वतनना" वैभवनी समृध्दी कितली, 19 अनी ज्या आपन ईश्वास ठेवनारा त्या आपला विषयना त्याना सामर्थ्यना अपार महत्व ते काय शे हाई तुम्हीन त्याना बलशाली पराक्रमना कृतीवरतीन वळखीन लेवाले पाहिजे. 20 त्यानी ती कृती ख्रिस्तमा दखाडीसन त्याले मरेलमातीन ऊठाडं; 21 अनी सर्व स्वर्गीय सत्ताधीश, अधिकार, सामर्थ्य, प्रभुत्व अनी भावी युगनं कोणतं बी नाव ल्या, त्या सर्वासतीन त्याले उंच करीसन स्वर्गमा उजवा बाजुले बसाडं. 22 १:२२ कलस्सै १:१८त्यानी सर्व त्याना पायखाल ठेवं, अनी त्यानी सर्वासवर मस्तक व्हवाले पाहिजे म्हणीसन त्याले मंडळीले दिधं; 23 मंडळी हाईच त्यानं शरीर. जो सर्वासनी सर्वकाही भरस त्यानी ती भरेल शे.