15 तर आपण प्रितीतीन सत्यले धरीसन मस्तक जो ख्रिस्त त्याना परिणामतीन सर्व प्रकारतीन वाढाले पाहिजे. 16 ४:१६ कलस्सै २:१९त्यानाघाई पुरा शरिरनी, पुरवठा करनारा प्रत्येक सांधाना योगे, जुळवणूक अनं जमवाजमव व्हस, प्रत्येक अगं आपआपला परिमाणतीन काम करत र्हास, अनी आपली रचना प्रितीमा व्हवाकरता वाढ करी लेस.