25 ५:२५ कलस्सै ३:१९; १ पेत्र ३:७पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, 26 यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे. 27 अनी गौरवयुक्त मंडळी अस ती स्वतःले तयार कराले पाहिजे, म्हणजे तिले डाग, सुरकुती अनं कोणतं बी कमतरता यासनामाईन काहीच नही दखावता ती पवित्र अनं निर्दोष अस ऱ्हावाले पाहिजे.