28 त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. 29 कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. 30 कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस. 31 म्हणीन पुरूष आपला माय बापले सोडीसन आपला बायकोले जडी राही; अनी त्या उभयता एक शरीर व्हतीन. 32 हाई रहस्य मोठं शे पण मी ख्रिस्त अनं मंडळी यासना संबधनाबद्ल बोली ऱ्हायनु शे. 33 तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.