13 यास्तव तुम्हीन वाईट दिनले विरोध कराले अनं सर्वकाही करानंतर टिकी राव्हाले समर्थ पाहिजे म्हणीसन देवनी सगळी शस्त्रसामग्री ल्या. 14 यास्तव सत्यतीन आपली कंबर बांधिसन, नितीमत्वरुपी उरस्त्राण धारण करा. 15 शांतीना सुवार्तातीन बनेल सिध्दतानी पादुका पायमा घालीसन, 16 अनी या सर्वाखेरीज जिना मुये दुष्टना सर्व जळता बाण तुम्हले विझाडता येतीन ती ईश्वासरुपी ढाल धरीसन उभा रहा. 17 तारणरुपी शिरस्त्रान अनं देवनं वचन अशी आत्मानी तलवार, हाई बी ल्या. 18 सर्व प्रकारे प्रार्थना अनं ईनंती करा, सगळा समयले आत्माना प्रेरणातीन प्रार्थना करा; अनी या कामतीन सर्व तत्पर व्हईसन अनं सर्व पवित्र लोकेसकरिता प्रार्थना करीसन जागृत राहा.