पुरीम सण
20 मंग मर्दखयनी हाई सर्वी माहिती लिखी काढी अनी अहश्वेरोश राजाना दूरना अनं जोडेना सर्वा प्रांतमाधला यहूदी लोकसले पत्र धाडीसन येनाप्रमाणं फर्मान करात. 21 अदार महिनाना चौदावा अनं पंधरावा ह्या दिन वरीसन वरीसले पाळत जावानं. 22 ह्या दिनले यहूदीसले आपला शत्रुसपाईन विसावा प्राप्त व्हयना, हाऊ महिनामा दु:ख जाईन आनंद प्राप्त व्हयना, अनी शोक जाईन शुभदिन प्राप्त व्हयना, म्हणीन तो पाळानं; ह्या दिन आनंद उत्सव करामा, एकमेकसले भेटना ताटे धाडानं अनं गोरगरीबसले दानधर्म करामा घालानं. 23 यहूदी लोकसनी सुरवात करेल व्हती त्यानाप्रमाणं अनं मर्दखयनी त्यासले लिखी धाडेल व्हतं त्यानाप्रमाणं यहूदीसनी संप्रदाय चालू करानं कबूल करात. 24 सर्वा यहूदीसना विरोधी अगागी हामान बिन हम्मदाथा यानी यहूदीसना नाश कराना बेत करीसन त्यासना पुर्ण नायनाट कराकरता त्यानी पुर म्हणजे चिठया टाकेल व्हत्यात. 25 पण राजाना ध्यानमा हाई प्रकरण ईसन त्यानी लेखी हुकूम करात यावरीन हामानना जे कपट कारस्थान यहूदी लोकेविरूध्द योजेल व्हतं ते त्यानाच माथावर उलटना अनी तो अनं त्याना पोऱ्या फाशीना खांबवर टांगामा वनात. 26 यामुये पुर हाऊ शब्दवरीन त्या दिनले पुरीम हाई नाव पडनं. हाऊ पत्रमाधला अक्षरवरीन अनी त्यासनी स्वत: या बाबतमा जे दखेल व्हतं अनी त्यासनावर जे बितेल व्हतं त्यानावरीन. 27 यहूदी लोकेसनी आपलाकरता, आपला वंशजकरता अनं ज्या त्यामा सामील व्हयना व्हतात त्यासनाकरता असा अढळ नियम अनं प्रतिज्ञा करी की, त्या लेखनानुसार वरीसवरीसले योग्य काळले ह्या दोन दिन पाळानं. 28 अनी पिढानपिढी प्रत्येक कुटुंबमा, प्रत्येक प्रांतमा अनं प्रत्येक गावमा ह्या दिननं स्मरण करीसन तो पाळामा येवाले पाहिजे. हाऊ पुरीम सणना दिन पाळाले यहूदी लोकसनी चुकानं नही; त्यानं स्मरण त्यासना वंशजमाईन कधीच नष्ट व्हवाले नको.
29 हाऊ दुसरा पत्रनानुसार पुरीम पाळानं मंजुर व्हवाले पाहिजे म्हणीन अबीहाइलानी पोर एस्तेर राणी हिनी अनी मर्दखय यहूदी यानी आपला अधिकारतीन फर्मान लिखात. 30 त्याना नकला मर्दखयनी अहश्वेरोश राजाना एकशे सत्तावीश प्रांतमाधल्या सर्वा यहूदीसले लिखी धाडात; त्यामा शांती देनारा सत्यवचनं व्हतं. 31 ह्या पत्रना आशय अश व्हतं की, पुरीमना नेमेल येळले मर्दखय अनं एस्तेर राणी यासन्या आज्ञा प्रमाणं अनी यहूदी लोकसनी स्वत:करता अनं आपला वंशजकरता करेल ठरावप्रमाणं उपवास अनं विलाप करामा येवाले पाहिजे. 32 पुरीमना संबधना नियम एस्तेरना आज्ञातीन स्थिर करामा वना, अनी हाई ग्रंथमा लिखी ठेवात.