13 म्हणीसन मिसरी लोके इस्त्राएल लोकसकडतीन सक्तीतीन काम करी लेवू लागणात. 14 त्यासनाकडतीन मातीना गारा अनं ईटा बनाडी लेत अनी त्यासले वावर माधला प्रत्येक प्रकारणा कामं कराले लायेत; असा कठीण काममुये त्यासले जीव नकोसा व्हयना; कारण त्यासनाकडतीन ज्या कामे करी ली राहींतात त्या भलताच जबरदस्तीना व्हतात.