पहिला वल्हांडण सण
21 मंग मोशेनी सर्वा इस्त्राएलना वडील मंडळीले बलाईसन सांगं, "तुम्हीन आप आपला घरानाप्रमाणे एक एक कोकरू निवाडी लेवानं अनी वल्हांडणना यज्ञ कराना, असा तुमना परिवार वल्हांडण सण साजरा करू शकतस. 22 नंतर एजोब झाडनी एक जुडी लिसन ती भांडामातील रक्तमा बुचकाडानी अनी तीनाघाई ते रक्त दरवाजानी चौकटले वर अनं आजुबाजू लावानं अनी सकाळपावत कोणी बी घरना बाहेर जावानं नही. 23 कारण परमेश्वर मिसरीसना वध कराकरता बाहेर फिराव शे, ज्या ज्या घरना चौकटले वर अनं आजुबाजू रक्त लागेल परमेश्वर दखी तर ते दार तो वलांडीसन जाई अनी वध करणाराले वध कराकरता तुमना घरमा जाऊ देवाव नही.