11 परमेश्वर मोशेले बोलना, 12 "इस्त्राएल लोकसनी कुरकूर मी ऐकेल शे, त्यासले सांग की, संध्याकायले तुम्हीन मांस खाशात अनी सकाय पोटभर भाकर खाशात तवय मी तुमना देव परमेश्वर शे हाई तुमले समजी."
13 16:13 गणना 11:31 अनी संध्याकायले अस व्हयनं की लावरी पक्षी ईसन सर्व छावनीवर पसरणार अनी सकाय छावनीना सर्वी बाजूले दव पडनं. 14 हाई पडेल दव सुकनं तवय ते रानमधली सर्व जमिनवर खवल्यासनामायक बारीक चादर पसरेल दखायनी. 15 16:15 १ करिंथ 10:3 जवय इस्त्राएल लोकंसनी ते दखीसन एकमेकसले बोलनात, "हाई काय शे?" ते काय व्हतं हाई त्यासले माहीत नव्हतं; मोशे त्यासले बोलना, "परमेश्वरनी तुमले खावाले देयल शे ते हाईच शे.