17 तवय इथ्रो बोलना, "तु जे करस ते बरोबर नही शे. 18 18:18 गणना 11:14; अनुवाद 1:9अस करीसन तु अनी तुना संगेना सर्व लोकं थकी जातीन, कारण हाई काम तुले एकलाले भलतच जड पडी. 19 तर आते तु मनं ऐक मी तुले सल्ला देस, या लोकसकरता देवना तु मध्यस्ती व्हय अनी यासना झगडा देवकडे ने. 20 विधी अनं नियम त्यासले शिकाड अनी त्यासनी कोणता मार्गतीन चालानं अनी कोणतं काम करानं हाई त्यासले दखाडत जाय. 21 पण तु या सर्व लोकसमातीन गुणवान, देवनं भय धरणारा, सत्य वागणारा, घुसखोरी न करणारा असा माणसे निवाडी ले अनी त्यासले हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा लोकसवर नायक म्हणीन नेमी ठेव. 22 त्यासनी लोकसना कायम न्यायनिवाडा कराना; त्यासनी सर्व मोठा झगडा तुनाकडे आनाले पाहीजे अनी धाकला झगडा त्यासनीच मिटाडानात; अस करामुये तुना भार हलका व्हई अनं त्या तुना भारना वाटेकरी व्हतीन. 23 तु अस करशी अनी देवनी तुले अशी आज्ञा दिधी तर तुना बचाव व्हई अनी या सर्व लोकं आप आपला घर सुखमा जातीन."