21 पण तु या सर्व लोकसमातीन गुणवान, देवनं भय धरणारा, सत्य वागणारा, घुसखोरी न करणारा असा माणसे निवाडी ले अनी त्यासले हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा लोकसवर नायक म्हणीन नेमी ठेव. 22 त्यासनी लोकसना कायम न्यायनिवाडा कराना; त्यासनी सर्व मोठा झगडा तुनाकडे आनाले पाहीजे अनी धाकला झगडा त्यासनीच मिटाडानात; अस करामुये तुना भार हलका व्हई अनं त्या तुना भारना वाटेकरी व्हतीन.