मोशेना जन्म
1 लेवी घरानामातील एक माणुसनी लेवी वंशनी पोरसंगे लगीन करं. 2 2:2 प्रेषित 7:20, इब्री 11:23ती बाई गर्भवती व्हईसन तिले पोऱ्या व्हयना, ते बाळ देखणा शे हाई दखीसन तिनी त्याले तीन महीना दपाडीन ठेवं. 3 पुढे त्याले दपाडीन ठेवता ई नही राहिंतं म्हणीसन लव्हाळंनं एक टोपली बनाडीन त्याले डांबर चोपडं अनं ती टोपलीमा त्या पोऱ्याले ठिसन नदीना किणारले जे उच्च गवत ऱ्हास तठे ठेवं. 4 अनी त्यानं काय व्हई हाई दखाकरता त्यानी बहीण थोडी दूर उभी राहिनी.
5 मंग फारोनी पोर तठे आंग धोवाले वनी, ती तीना दासीससंगे नदी काठतीन जाई राहींती तवय गवतमा ती टोपली तिले दखायनी, तीनी दासीसले ती टोपली आणाले सांगं. 6 जवय ती टोपली उघाडी तवय तिले ते बाळ दखायनं, ते रडी राहिंतं, तिले त्यानी किव वनी ती बोलनी, "हाई कोणीतरी इब्रीनं बाळ शे."
7 तवय त्या बाळनी बहिण फारोना पोरले बोलनी, "तुमनाकरता ह्या बाळले दुध पाजाकरता इब्री बायासमातीन एखादी बाईले बलावू का?"
8 फारोनी पोर तिले बोलनी, "जाय" बलावं तवय ती पोर जाईसन त्या बाळना मायले लई वनी. 9 फारोनी पोर तिले बोलनी, "ह्या पोऱ्याले लई जा अनी मनाकरता ह्याले दुध पाज, मी तुले पगार दिसू." मंग ती बाई त्याले लई जाईसन दुध पाजू लागनी. 10 ते बाळ वाढीसन मोठं व्हयनं तवय ती त्याले लिसन फारोना पोरकडे गई, अनी तो तिना पोऱ्या व्हयना, तिनी त्यानं नाव मोशे ठेवं, "कारण मी त्याले पाणीमातीन काढेल शे" अस ती बोलणी.