5 मंग फारोनी पोर तठे आंग धोवाले वनी, ती तीना दासीससंगे नदी काठतीन जाई राहींती तवय गवतमा ती टोपली तिले दखायनी, तीनी दासीसले ती टोपली आणाले सांगं. 6 जवय ती टोपली उघाडी तवय तिले ते बाळ दखायनं, ते रडी राहिंतं, तिले त्यानी किव वनी ती बोलनी, "हाई कोणीतरी इब्रीनं बाळ शे."
7 तवय त्या बाळनी बहिण फारोना पोरले बोलनी, "तुमनाकरता ह्या बाळले दुध पाजाकरता इब्री बायासमातीन एखादी बाईले बलावू का?"
8 फारोनी पोर तिले बोलनी, "जाय" बलावं तवय ती पोर जाईसन त्या बाळना मायले लई वनी. 9 फारोनी पोर तिले बोलनी, "ह्या पोऱ्याले लई जा अनी मनाकरता ह्याले दुध पाज, मी तुले पगार दिसू." मंग ती बाई त्याले लई जाईसन दुध पाजू लागनी.