4 मी दख ते उत्तरकडतीन तुफानना वारा सुटना, तवय एक मोठा ढग ई राहिना शे, त्यानामां गुंडाळेल एक आगना गोया व्हता; त्याना आजुबाजूले मोठा ढग पसरेल राहीसनं आगना मजारतीन पितयनामायक तेज झळकत व्हता. 5 त्याना मजारना भागमां चार जनावरसना आकृतीनामायक काहीतरी दखायनं; दखावाले त्या माणुसना आकृतीनामायक व्हतात.