13 मना भाऊ अनी बहिणीसवन, ते मी मिळाडं अस समजस नही, पण एक गोष्ट शे की, ती कराना मी निश्चय करस, जे भुतकाळमा शे ते मी ईसरस, अनी जे मनासमोर शे ते मिळाडाना प्रयत्न करस. 14 ख्रिस्त येशुमा जे वरनं पाचारन, जे देवनं बक्षीस ते जिंकाकरता मर्यादावरनी खुनकडे मी धावस.