देवना शब्द त्याना पोऱ्याकडतीन
1 देव भुतकाळमा बराचदावं अनं येगयेगळा प्रकारतीन आपला पुर्वजससंगे 1:1 संदेष्टा देवना संदेश सांगणारासंदेष्टासनाद्वारा बोलना, 2 तो या शेवटला दिनसमा आपलासंगे आपला पोऱ्याद्वारा बोलेल शे, देवनी त्याले सर्व वस्तुसना वारीस करेल शे अनी त्यानाद्वारा त्यानी सर्व सृष्टी उत्पन्न करेल शे.