1 यहूदी नियमशास्त्रमा तर भावी चांगल्या वस्तुसना वास्तविक प्रतिमा नही, पण सावली शे, लोकसकडतीन देवले कायम वरीस दर वरीस चढाई जाणारा अर्पणसघाई जोडे येणाराले नियमशास्त्र कधीच योग्य ठरावु शकस नही? 2 ते जर योग्य ठरावतं तर, एकदाव शुध्द व्हयेल लोके देवनी आराधना करनारासनं यानापुढे जर पाप सरी जातं तर त्यासनं अर्पण करानं बंद व्हतं नही का. 3 पण ते यज्ञ वरीसनंवरीस पापसनी आठवण करी देतस. 4 कारण बैलसनं अनी बोकड्यासनं रक्त यासनामुये पापं दुर व्हतीन हाई अशक्य शे.