10 कारण आपला शारिरीक बाप त्यासना मनले पटनं तशी थोडा दिन शिक्षा करी, पण देव जे करस ते आपला हितकरता, म्हणजे आपण त्याना पवित्रपणना भागीदार व्हवाले पाहिजे म्हणीसन करस. 11 कोणती बी शिक्षा लगेच आनंद देणारी वाटस नही, खेदनी वाटस, तरी ज्यासले तिना अभ्यास व्हयेल शे त्यासले ती पुढे न्यायीपणं हाई शांतीकारक फळ देस.