9 यामुये जसा देवनी सातवा दिन विसावा लिधा तसा विसावा देवना लोकसकरता बाकी शे. 10 ज्या कोणी देवना विश्रामस्थानमा येल शे त्यासनी, जस देवनी आपला कामे सराईन विसावा लेयल शे तसं त्यासनी आपला बी कामे सराईन विसावा लेतीन. 11 यामुये, या आपण, त्या विश्रामस्थानमा येवाना व्हई तितला प्रयत्न कराले पाहिजे, याकरता की देवनी आज्ञा न मानामुये कोणा नाश व्हवाले नको.