4 ज्या लोकं आपला ईश्वासमा भटकी गयात त्यासले परत पश्चताप कराकरता कशं लयता ई? कारण ज्या लोकसले एकदाव प्रकाश भेटी गया, ज्यासनी स्वर्गीय दाननी चव लिधी, ज्या पवित्र आत्माना भागीदार व्हयनात, 5 अनी ज्यासनी देवना सुवचनसनी अनं येणारा युगना सामर्थ्यना अनुभव लेयल शे, 6 त्या जर ईश्वासमा भटकी गयात, तर त्यासले पश्चाताप करता परत नवं बनाडानं हाई अशक्य शे, कारण हाई त्यासनं भटकनं म्हणजे त्यासनी देवना पोऱ्याले परत क्रुसखांबवर खियानं अनी त्याना उघड अपमान करनं अस शे.