6 पण आते येशुले आखो श्रेष्ठ याजकपण मिळेल शे, कारण तो एक चांगला वचनावर स्थापेल अधिक चांगला करारना मध्यस्थी शे.
7 कारण तो पहिला करार निर्दोष राहता, तर दुसरानी गरज नही ऱ्हाती. 8 देव त्यानाच लोकसना दोष शोधीसन म्हणस,
"परमेश्वर म्हणस, असा दिन ई राहिनात की,
त्यामा इस्त्राएलना घराना अनं यहुदाना घराना यासनासंगे मी नवा करार करसु,
9 मी त्यासना पुर्वजसना हात धरीसन त्यासले मिसर देशमाईन बाहेर आनं,
तवयना करारनामायक हाऊ करार व्हवावु नही,
कारण मना करारप्रमाणे त्या ईश्वासु राहिनात नही,
अनी मी त्यासनाकडे लक्ष दिधं नही,
10 तर परमेश्वर म्हणस, त्या दिन नंतर इस्त्राएलना घरानासंगे जो करार
मी करसु तो हाऊ;
मी आपला नियम त्यासना ईचारमा ठेवसु,
अनी ते त्यासना मनवर लिखसु
अनी मी त्यासना देव असा व्हसु,
अनी त्या मना लोके असा व्हतीन,
11 तवय प्रत्येकजन आपला गावबंधुले,
प्रत्येक आपला भाऊ अनं बहिणीसले,
परमेश्वरले वळखा असा बोध करावु नही,
कारण त्यासनामातीन धाकलापाईन मोठापावत,
त्या सर्वा माले वळखतीन,
12 कारण मी त्यासना पापसनी क्षमा करसु,
अनी त्यासना पापसनी यापुढे कधीच आठवण करावु नही."
13 त्यानी नवं अस म्हणामुये पहिले जे व्हतं ते जुनं व्हई गयं, अनी जे जुनं अनं कुजी राहीनं ते लवकर नाहीसं व्हई.