पृथ्वीवरली अनं स्वर्गमाधली आराधना
1 पहिला करारमा बी उपासनाना विधी व्हतात अनं एक पवित्रस्थान व्हतात, ज्या पृथ्वीवर व्हतात. 2 पहिला मंडप तयार करेल व्हता त्यामा दिवासनी समई, मेज अनी समर्पित भाकरी व्हत्यात, त्याले पवित्रस्थान म्हणेल शे. 3 अनी दुसरा पडदाना पलिकडे परमपवित्र स्थान म्हणेत तो मंडप व्हता. 4 त्यामा धुप जाळाकरता सोनानी एक वेदी अनी करारना कोश व्हता. या कोशमा मान्ना ठेयल सुवर्णपात्र, कळ्या येल अहरोननी काठी, अनं करारना आज्ञासन्या दगडी पाट्या या व्हत्यात. 5 अनी त्यानावर गौरवशाली करूबीम9:5 करूबीम पंख व्हतात असा प्राणी आपला पंखासघाई दयासनवर छाया करी राहिंतात, पण आम्हीन या सर्व गोष्टीसनं आठे सविस्तर वर्णन करू नही शकावुत.