13 कारण विधीनानुसार जर अशुध्द लोकसवर बोकडसनं अनी बैलसनं रक्त तसच वासरूना राखना शितडा पडनात म्हणजे शरिरना शुध्दताकरता पवित्र करस. 14 तर सार्वकालिक आत्मानाद्वारा ज्यानी निष्कलंक अस स्वतःनं देवले अर्पण करं त्या ख्रिस्तनं रक्त तुमना विवेकभाव जिवत देवना सेवा करता निर्जीव कामसपाईन कितलं तरी विशेषतातीन शुध्द करी.