14 १०:१४ मत्तय ११:२७; लूक १०:२२मी उत्तम मेंढपाय शे, मना मेंढरंसले मी वळखस अनी मना मेढरं माले वळखतस. 15 तसच जसं बाप माले वळखस अनी मी बापले वळखस अनी मी मेंढरंसनाकरता मना जीव देस. 16 ज्या मेंढवाडामधला नहीत असा मना दुसरा बी मेंढरं शेतस, माले त्यासले बी आणनं शे; त्या मनी वाणी ऐकतीन, मंग एक कळप, एक मेंढपाय अस व्हई."