21 मार्था येशुले बोलनी, "प्रभुजी, तुम्हीन आठे राहतात तर मना भाऊ नही मरता! 22 पण तरी आते बी तुम्हीन जे काही देवजोडे मांगशात ते देव तुमले दि, हाई माले माहीत शे."
23 येशुनी तिले सांगं, "तुना भाऊ परत जिवत व्हई."
24 मार्था त्याले बोलनी, "तो शेवटला दिनले पुनरूत्थानना येळले परत जिवत व्हई हाई माले माहीत शे."
25 येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी; 26 अनी जो जिवत शे अनं मनावर ईश्वास ठेवस तो कधीच मरावं नही; यावर तु ईश्वास ठेवस का?"
27 ती त्याले बोलनी, "हो, प्रभुजी! जो जगमा येणारा देवना पोऱ्या ख्रिस्त तो तुम्हीनच शेतस, असा ईश्वास मी धरेल शे." अस बोलीन ती निंघी गई.