जयोत्सवतीन यरूशलेममा प्रवेश
12 दुसरा दिन सणले येल मोठी लोकसनी गर्दी येशु यरूशलेमले ई राहीना हाई ऐकीन. 13 खजुरन्या फांद्या लिसन त्यानी भेटकरता बाहेर निंघनात, अनी गजर करीसन बोलनात, "होसान्ना! प्रभुना नावतीन येणारा! इस्त्राएलसना राजा धन्यवादित असो!"
14 येशुले गधडानं धाकलं शिंगरू भेटावर तो त्यानावर बसना, हाई शास्त्रमा लिखेलप्रमाणे घडनं ते अस,
15 "हे सियोननी कन्या! भिऊ नको,
दख तुना राजा,
गाढवना शिंगरूवर बठीन येस."
16 या गोष्टी त्याना शिष्यसले पहिले समजन्याच नहीत; येशुनं गौरवतीन ऊठना तवय त्यासले याद वनं की, त्यानाबद्दल या गोष्टी लिखेल व्हत्यात तसच लोकसनी त्यानासंगे करं.
17 त्यानी लाजरसले कबरमातीन बलाईन मरेल मातीन जिवत करं त्या येळले जी लोकसनी गर्दी त्यानासंगे व्हती ती गर्दी त्यानाबद्दल साक्ष दि राहींती. 18 यावरतीन बी लोके त्याले भेटाले गयात, कारण त्यानी या चमत्कार करेल शेतस, अस त्यासनी ऐकेल व्हतं. 19 यामुये परूशी लोके एकमेकसले बोलनात, "तुमनं काहीच चाली नही राहीनं हाई ध्यानमा ल्या! दखा, सर्व जग त्यानामांगे चाली राहीनं!"