येशु शिष्यसना पाय धुवस
1 वल्हांडण सणना पहिले, या जगमाईन पिताकडे जावानी आपली येळ येल शे हाई येशुनी समजी लिधं, अनी या जगमातील आपलासवर त्यानं प्रेम व्हतं ते त्यानी शेवटपावत करं.
2 येशु अनी त्याना शिष्य संध्याकायनं जेवण करी राहिंता तवय शिमोनना पोऱ्या यहुदा इस्कर्योत याना मनमा त्याले धरी देवानं अस सैताननी पहिलेच घाली देयल व्हतं 3 तवय आपला हातमा पितानी सर्वकाही देयल शे, आपण देवकडतीन वनु अनी देवकडे जाई राहीनु, 4 हाई वळखीसन जेवण करतांना येशु जेवणवरतीन ऊठना, त्यानी आपला कपडा काढी ठेवात अनी रूमाल लिसन कंबरले गुंडाळी लिधा. 5 मंग तो एक भांडामा पाणी लिसन शिष्यसना पाय धवु लागना, अनी कंबरले गुंडाळेल रूमालघाई ते पुसू लागना. 6 तो शिमोन पेत्रकडे वना, तवय तो त्याले बोलना, "प्रभुजी, तुम्हीन मना पाय धुतस का?"
7 येशुनी उत्तर दिधं, "मी करस ते तुले आत्ते कळाव नही, ते पुढे कळी."
8 पेत्र त्याले बोलना, "तुम्हीन कधीच मना पाय धुवाले नको!" येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुना पाय जर नही धुवात तर मनासंगे तुले वाटा नही."
9 शिमोन पेत्र त्याले बोलना, "प्रभुजी, मना फक्त पायच धुवू नका, तर हात अनी डोकं बी धुवा."
10 येशुनी त्याले सांगं, "ज्यानं आंग धोवायेल शे त्याले पायशिवाय काहीच धुवानी गरज नही, तो पुरा शुध्द शे, अनी तुम्हीन शुध्द शेतस, तरी सर्वाजन नही." 11 कारण आपले धरी देणार माणुस त्याले माहीत व्हता, यावरतीन तो बोलना, "तुम्हीन सर्वाच शुध्द नही."
12 १३:१२ लूक २२:२७ मंग त्यासना पाय धुवानंतर, आपला कपडा घालीसन येशु बसना अनी त्यानी त्यासले सांगं, "मी तुमले काय करं हाई तुमले समजनं का? 13 तुम्हीन माले गुरू अनं प्रभु अस म्हणतस, ते बराबर म्हणतस, कारण मी तसाच शे. 14 यामुये जो मी तुमना प्रभु अनं गुरू, तुमना पाय धुवात तर तुम्हीन एकमेकसना पाय धुवालेच पाहिजे. 15 हाऊ मी तुमले एक कित्ता घाली देयल शे, जसं मी तुमले करं तसं तुम्हीन कराले पाहिजे. 16 १३:१६ मत्तय १०:२४; लूक ६:४०; योहान १५:२०मी तुमले खरंखरं सांगस दास आपला धनीपेक्षा थोर नही, अनी जो धाडेल तो धाडणारापेक्षा थोर नही. 17 या गोष्टी तुमले माहीत शेतस अनी जर त्यानामायक तुम्हीन चालशात, तर तुम्हीन धन्य शेतस.