पिताकडे जावानी वाट
1 येशुनी त्यासले सांग, "तुम्हीन मनमा नाराज व्हवु नका; देववर ईश्वास ठेवा अनी मनावर बी ईश्वास ठेवा. 2 मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु. 3 अनी मी जाईसन तुमनाकरता जाग तयार करी म्हणजे परत ईसन तुमले आपलाजोडे लिसु, यानाकरता की जठे मी शे तठे तुम्हीन बी ऱ्हावाले पाहिजे.