21 "ज्यासनाजोडे मन्या आज्ञा शेतस अनं ज्या त्या पाळतस त्याच मनावर प्रिती करनारा शेतस, अनी ज्या मनावर प्रिती करतस मना पिता बी त्यासनावर प्रिती करस, मी बी त्यासनावर प्रिती करसु अनं स्वतः त्यासले प्रकट व्हसु."
22 यहुदा14:22 यहुदा (इस्कर्योत नही) त्याले बोलना, "प्रभु, अस काय व्हयनं की तुम्हीन स्वतः आमले प्रकट व्हशात अनी जगले प्रकट व्हणार नही?"
23 येशुनी त्याले उत्तर दिधं, "ज्यानं मनावर प्रेम व्हई" तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु. 24 मनावर कोणं प्रेम नही तर तो मनी शिकवन पाळाव नही, जी शिकवन तुम्हीन ऐकतस ती मनी नही, ज्या पितानी माले धाडेल शे त्याना शेतस.