13 आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही. 14 मी तुमले जे काही सांगस ते जर तुम्हीन करशात तर तुम्हीन मना मित्र शेतस. 15 मी आत्तेपाईन तुमले दास म्हणस नही, कारण धनी काय करस ते दासले माहीत नही ऱ्हास. पण मी तुमले मित्र म्हणेल शे, कारण जे काही मी आपला पिताकडतीन ऐकी लिधं ते सर्व मी तुमले सांगेल शे.
Publicidade