7 तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु. 8 तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि. 9 त्या मनावर ईश्वास ठेवतस नही यावरतीन पाप बद्दल; 10 मी पिताकडे जाई राहीनु अनी पुढे तुमले मी दिसावु नही यावरतीन धार्मीकताबद्दल; 11 अनी या जगना अधिकारीना न्याय व्हयेल शे यावरतीन न्यायनिवाडाबद्दल;