10 मंग पिलातनी त्याले सांगं, "मनासंगे बोलस नही का? तुले सोडाना अधिकार माले शे, अनी तुले क्रुसखांबवर खियाना अधिकार बी माले शे, हाई तुले माहीत नही का?"
11 येशुनी उत्तर दिधं, "तुले देवकडतीन अधिकार भेटता नही तर तो मनावर अजिबातच चालता नही; यामुये ज्यानी माले तुना स्वाधिन करेल शे तो दोषी शे अनी त्यानं पाप अधिक शे."