23 शिपाईसनी क्रुसखांबवर येशुले खियानंतर त्याना कपडा लिधात अनी एक एक शिपाईसले एक एक भाग असा त्याना चार तुकडा करात; त्यासनी अंगरखा बी लिधा; तो अंगरखा शियेल नव्हता तो खालपावत पुरा ईनेल व्हता. 24 यामुये त्या एकमेकसले बोलनात, "याले आपण फाडानं नही, तर कोणले हाऊ भेटी हाई चिठ्ठ्या टाकीन दखुत," हाई यानाकरता व्हयनं की,
"त्यासनी मना कपडा आपसमा वाटी लिधात,
अनी मना अंगरखावर चिठ्ठ्या टाक्यात,"
असा जो शास्त्रलेख तो पुरा व्हवाले पाहिजे. तसच शिपाईसनी करं.
25 येशुना क्रुसखांबजोडे त्यानी माय, त्यानी मावशी, क्लोपानी बायको मरीया, अनी मरीया मग्दालीया, ह्या उभ्या व्हत्यात. 26 मंग येशुनी आपली मायले अनी ज्या शिष्यवर त्यानी प्रिती व्हती त्याले जोडे उभं राहेल दखीसन मायले बोलना, "बाई, दख, हाऊ तुना पोऱ्या!"
27 मंग तो शिष्यले बोलना, "दख, हाई तुनी माय!" ती येळपाईन त्या शिष्यनी तिले आपला घर ऱ्हावाले लई गया.