येशुनं मरणं
28 यानानंतर सर्व पुरं व्हई जायेल शे हाई समजीसन येशुनी शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन, "माले तिश लागेल शे" अस बोलना. 29 तठे आंब भरीन ठेयल एक भांडं व्हतं म्हणीसन त्यासनी आंबना भरेल स्पंज एजोबना काठीवर बसाडीसन त्याना तोंडले लावा. 30 येशुनी आंब लेवानंतर, "पुरं व्हई गयं" अस सांगं; अनी मान टाकीसन जीव सोडा.