4 तवय पिलातनी परत बाहेर ईसन यहूदीसनी गर्दीले सांगं, "त्यानामा माले काहीच अपराध दखास नही, हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीसन मी त्याले तुमनाकडे बाहेर आनस." 5 तवय येशु जांभळा कपडा अनी काटासना मुकूट घालेल असा बाहेर वना अनी पिलात त्यासले बोलना, "दखा, हाऊ माणुस!"
6 मुख्य याजक अनी त्यासना मंदिरना रक्षक त्याले दखीन वरडीसन बोलनात, "त्याले क्रुसखांबवर खिया! क्रुसखांबवर खिया!" पिलात त्यासले बोलना, "तुम्हीनच त्याले लिसन क्रुसखांबवर खिया, कारण माले त्यानामा अपराध दखाई नही राहीना."