येशु मरीया मग्दालीयाले दर्शन देस
11 ईकडे मरीया बाहेर कबरनीजोडे रडत उभी व्हती; अनी रडता रडता तिनी कबरमा डोकाईन दखं. 12 तवय जठे येशुनं शरीर ठेयल व्हतं तठे पांढरा शुभ्र कपडा घालेले दोन देवदूत, एक उशीकडे अनी एक पायथाकडे, असा बठेल तिनी दखात. 13 त्या तिले बोलनात, "बाई, का बरं रडस?" ती त्यासले बोलनी, "त्या मना प्रभुले लई गयात, अनी त्याले कोठे ठेयल शे हाई माले माहीत नही म्हणीसन."
14 अस बोलीसन ती पाठमोरी फिरनी, तो तिनी येशुले उभा असा दखा, पण तो येशु शे हाई तिले समजनं नही. 15 येशुनी तिले ईचारं, "बाई, का बरं रडस? तो कोण शे ज्याले तु शोधी राहीनी?" तो माळी शे अस समजीन तीनी त्याले ईचारं, "दादा, तु त्याले आठेन लई जायेल व्हई तर त्याले कोठे ठेयल शे हाई माले सांग, म्हणजे मी त्याले लई जासु."
16 येशुनी तिले सांगं, "मरीया!" ती त्यानाकडे वळीसन त्याले इब्री भाषामा बोलनी, "रब्बुनी!" म्हणजे "गुरजी!"
17 येशुनी तिले सांगं, "माले शिवु नको, कारण मी अजुन पिताकडे वर जायेल नही शे; तर मना भाऊसकडे जाईसन त्यासले सांग, जो मना पिता अनी तुमना पिता अनं मना देव अनी तुमना देव त्यानाकडे मी वर जाई राहीनु."
18 मरीया मग्दालीयानी जाईसन, मी प्रभुले दखं, अनं त्यानी माले या गोष्टी सांग्यात, हाई बातमी तिनी शिष्यसले सांगी.