येशु त्याना शिष्यसले दर्शन देस
19 त्याच रोज म्हणजे रविवारले संध्याकाय व्हवावर, जठे शिष्य व्हतात तठला दारं यहूदी अधिकारीसना धाकमुये बंद व्हतात, तरी येशु तठे वना अनी मझार उभा राहीसन त्यासले बोलना, "तुमले शांती असो," 20 अस बोलीसन त्यानी आपला हात अनी कुस त्यासले दखाडी; तवय प्रभुले दखीसन शिष्यसले आनंद व्हयना. 21 येशु परत त्यासले बोलना, "तुमले शांती असो; जसं पितानी माले धाडेल शे तसं मी बी तुमले धाडस." 22 असं बोलीन त्यानी त्यासनावर फूकंर टाकी अनी त्यासले सांगं, "पवित्र आत्मा ल्या. 23 २०:२३ मत्तय १६:१९; १८:१८ज्या कोणा पापनी तुम्हीन क्षमा करतस त्यानी क्षमा व्हयेल शे; अनी जर तुम्हीन कोणा पापसनी क्षमा नही करी तर त्याना पापसनी क्षमा नही व्हवावू."