येशु सात शिष्यसले दर्शन देस
1 त्यानानंतर तिबिर्या नावना तलावजोडे परत एकदाव येशु शिष्यसमा परत प्रकट व्हयना अनी तो असा प्रकट व्हयना; 2 शिमोन पेत्र, दिदूम म्हणजे जुळा म्हणेत तो थोमा, गालीलमाधला काना गावना नथनेल, जब्दीना दोन्ही पोऱ्या अनं त्याना शिष्यसमाधला दुसरा दोनजण या सर्व एकत्र व्हतात. 3 २१:३ लूक ५:५शिमोन पेत्रनी त्यासले सांगं, "मी मासा धराले जास." त्या त्याले बोलनात, "आम्हीन बी तुनासंगे येतस." तवय त्या निंघीसन नावमा बठनात अनी त्या रातले त्यासनी काहीच धरं नही. 4 मंग पहाट व्हवाना येळले येशु तलावना किनारले उभा राहीना; तोपावत तो येशु शे हाई शिष्यसले समजनं नव्हतं. 5 तवय येशुनी त्यासले ईचारं, "तरूणसवन, तुम्हीन काही पकडेल शे का नही?" त्यासनी, "काही नही" अस त्याले उत्तर दिधं. 6 २१:६ लूक ५:६त्यानी त्यासले सांगं, "तुम्हीन नावनी उजवी बाजुले जाळं टाका म्हणजे तुमले सापडी" यामुये त्यासनी जाळं टाकं, तवय मासासना घोळकामुये त्यासनाघाई ते ओढाई नही राहींतात ईतला मासा त्या जाळंमा अडकनात. 7 यावरतीन ज्या शिष्यवर येशुनी प्रिती व्हती तो पेत्रले बोलना, "प्रभु शे, हाऊ प्रभु शे!" हाई ऐकीसन शिमोन पेत्रनी अंगरखा घालीसन तो कंबरले गुंडाळा, कारण तो उघडाच व्हता, अनी तलावमा कुदी गया. 8 दुसरा शिष्य धाकली नाववर मासासनी भरेल जाळं वढत वढत किनारवर वनात. कारण त्या किनारापाईन जास्त दुर नव्हतात, त्या जवळपास शंभर मीटरवर व्हतात. 9 मंग काठवर उतरीसन त्यासनी कोळसाना ईस्तव अनी त्यावर भुजेल मासा अनी भाकर दखी, 10 "येशुनी त्यासले सांगं, तुम्हीन आते धरेल मासासमातीन काही आणा." 11 यामुये शिमोन पेत्रनी नावमा चढीसन एक शे त्रेपन्न मोठा मासासघाई भरेल जाळं काठवर ओढी आणं; इतला व्हतात तरी जाळं फाटनं नही.