21 येशु तिले बोलना, "बाई, तुम्हीन देवबापनी भक्ती या डोंगरवर अनी यरूशलेममा बी करावुत नहीत अशी येळ ई राहीनी, हाई मनं खरं मानी ले." 22 तुम्हीन शोमरोनीसले माहीत नही असानी भक्ती तुम्हीन करतस; आमले यहूदीसले माहीत शे असानीच भक्ती आम्हीन करतस, कारण यहूदी लोकसमातीनच तारण शे. 23 तरी खरा भक्ती करनारा लोके आत्मातीन अनं खरापणतीन देवबापनी भक्ती करतीन अशी येळ ई राहिनी कदाचित येलच शे, कारण आपली भक्ती करनारा असा पाहिजेत अशी देवबापनी ईच्छा शे.