31 त्याच येळले शिष्यसनी त्याले ईनंती करी की, "गुरजी, काहीतरी खाई ल्या!"
32 पण तो त्यासले बोलणा, "तुमले माहीत नही अस जेवण मनाजोडे खावाले शे." 33 यावरतीन शिष्य एकमेकसले बोलनात, "कोणी तरी त्यानाकरता जेवण तर नही लई वना ना?"
34 येशु त्यासले बोलना, "ज्यानी माले धाडेल शे त्याना ईच्छाप्रमाणे करानं अनी त्यानी माले कार्य पुरं करानं हाईच मनं जेवण शे."