46 ४:४६ योहान २:१-११ मंग येशु गालीलमातीन काना गावले परत वना, तठे त्यानी पाणीना द्राक्षरस करेल व्हता. तठे राजाना एक अधिकारी व्हता, त्याना पोऱ्या कफर्णहुम गावमा आजारी व्हता. 47 जवय येशु यहूदीयातीन गालीलले येल शे अस त्या अधिकारीनी ऐकं तवय तो त्यानाकडे गया, अनी तुम्हीन कफर्णहुमले ईसन मना पोऱ्याले बरं करा अशी त्यानी त्याले ईनंती करी, कारण तो मराले टेकेल व्हता. 48 त्यावर येशुनी त्याले सांगं, "तुम्हीन चिन्ह अनं चमत्कार दखाशिवाय ईश्वास ठेवश्यातच नही."
49 तो अधिकारी त्याले बोलना, "गुरजी, मना पोऱ्या मराना पहिले मनासंगे चला."
50 येशुनी त्याले सांगं, "जा; तुना पोऱ्या वाचेल शे!"
तो माणुस येशुना शब्दसवर ईश्वास ठेईन निंघी गया. 51 तो जातांना त्याना दास त्याले भेटीन बोलना, "तुना पोऱ्या वाची जायेल शे!"
52 त्यानी त्याले ईचारं त्याले कोणती येळले बरं वाटाले लागनं, त्यानी त्याले सांगं, कालदिन एक वाजाले त्याले बरं वाटाले लागनं. 53 तवय त्याना बाप समजी गया की जी येळले येशुनी सांगेल व्हतं की, "तुना पोऱ्या वाचेल शे," त्याच येळले हाई व्हईनं मंग त्यानी अनी त्याना सर्व घरानानी ईश्वास ठेवा.
54 येशुनी यहूदीया मातीन गालीलमा येवावर परत जो दुसरा चमत्कार करा तो हाऊच.